सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्ग नगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती कार्यक्रम 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हॉल सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी ३ वाजता बी एल कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना होणार आहे. बौद्धाचार्य सहदेव कदम यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी 3.30 वाजता सभेचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.एल कदम तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून आदरणीय एडवोकेट रोडे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 4:30 वाजता लहान मुलांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता सादर करण्यासाठी कवी संमेलन होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बी. एल. कदम, उपाध्यक्ष मधुकर जाधव सचिव आर. टी. कदम यांनी केले आहे

