Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

पोईप येरमवाडी रस्ता कामासाठी ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना निवेदन

पोईप येरमवाडी रस्ता कामासाठी ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना निवेदन

रस्ता काम करून देण्याचे दत्ता सामंत यांचे आश्वासन

येरम वाडीतील उबाठाचे कार्यकर्ते लवकरच शिंदे गटात

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप येरम म्हसकरवाडी मध्ये जाणारा रस्ता पूर्णतः खराब झाल्याने याबाबत पोईप येरम म्हसकरवाडीतील तरुण सहकार मंडळाचा कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना वाडीत आमंत्रित करून त्यांना शिल्लक रस्ता कामाबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले. याबाबत आपण लवकरच वाडीतील ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे रस्ता काम करून देवू असे आश्वासन यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिले.

सोमवारी पोईप येरम म्हसकरवाडी येथील तरुण सहकार मंडळाच्या कार्यालयात रहिवाश्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत यांच्या समवेत पोईप सरपंच श्रीधर नाईक, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, संतोष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, नाना परब, पंकज वर्दम, जितेंद्र परब, कमलेश प्रभू, मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेश येरम, माजी सेक्रेटरी शिवराम येरम, माजी अध्यक्ष अनंत येरम तसेच तरुण सहकार मंडळाचे मुंबई व ग्रामीण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोईप धरण ते सचिन पालव घरापर्यंत सुमारे ७०० मीटर रस्ता असून यातील २०० मीटर रस्ताकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. वरील ५०० मीटर खडीकरण डांबरीकरण रस्ता कामासाठी तसेच रस्ता दुतर्फा गटाराची मागणी यावेळी ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्याकडे केली. पावसाळ्यात जुन्या रस्त्याला गटारे नसल्याने पावसाचे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता बरोबर गटाराची मागणी केली.

याबाबत बोलताना दत्ता सामंत यांनी सांगितले की, मागील कित्येक वर्षे या वाडीतील ग्रामस्थ उबाठा शिवसेनेच्या पाठीशी राहिले असून ग्रामस्थांना अपेक्षेप्रमाणे आपली विकासकामे झाली नसल्याने आज १५ वर्षानंतर ग्रामस्थ आपल्या संपर्कात आले आहेत. चालू आर्थिक वर्षातील कामे जवळपास पूर्ण झालेली नसून या वाडीतील रस्ता काम आपल्या पर्यंत उशिराने आले आहे. परंतु ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे नाहीतर यातील काही मीटर रस्ता आपण स्वखर्चाने लवकरच पूर्ण करून देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या वाडीतील रहिवाशांनी आपल्याला दिलेले निवेदन व विश्वास याबाबत आपण नक्कीच सकारात्मक कार्यवाही करू असे ते म्हणाले. याबाबत दत्ता सामंत यांनाही लवकरच आपण शिंदे गटात प्रवेश करू असे आश्वासन दिले. दत्ता सामंत यांनी वाहतुकीस अयोग्य झालेल्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून रस्ता कामाचा अंदाज घेतला.

rapan bottom