Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

पोईप खालची पालववाडी उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पोईप खालची पालववाडी उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप खालची पालववाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाला धक्का बसला आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात दत्ता सामंत यांच्या समवेत माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, माजी नगरसेवक दीपक पाटकर, कमलेश प्रभू, प्रशांत बिरमोळे, ग्राप. सदस्य सहदेव वेंगुर्लेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोईप खालची पालववाडी ग्रामस्थांच्या वतीने दत्ता सामंत यांना रस्त्याच्या दूरावस्थेबाबत निवेदन देऊन रस्ता नूतनीकरणाची मागणी केली. यावेळी बोलताना वाडीतील ज्येष्ठ पदाधिकारी रमेश बाबुराव पालव यांनी सांगितले की मागील १५ वर्षे आपल्या वाडीतील रस्ता नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या वाडीतील कोणतीही विकासकामे मागील काही वर्षांपासून झालेली नसून यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी आपल्या विकास कामांसाठी दत्ता सामंत यांच्या पाठीशी राहण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. आपली प्रामुख्याने रस्त्याची मागणी असून वाडीतील इतर विकासकामे टप्प्याटप्प्याने मागणी करणार असल्याचे रमेश पालव यांनी सांगितले.

यावेळी दत्ता सामंत यांचा वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की वाडीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या अवस्थेबद्दल आपल्याला निवेदन दिले आहे परंतु सध्या मार्च महिना संपला असून मागील वर्षातील आर्थिक बजेट पूर्ण झालेल्या आहे यामुळे पोईप खालची पालववाडी येथील पूर्ण रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे सध्या शक्य नाही. तरी वाडीतील ४०० ते ५०० मीटर रस्ता आपण स्वखर्चाने येत्या काही दिवसात पूर्ण करून देऊ असे आश्वासन दत्ता सामंत यांनी दिले. येथील ग्रामस्थांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण कदापिही विसरणार नसून याही पुढे वाडीतील शिल्लक विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी वाडीतील रमेश पालव, कृष्णा पालव, सहदेव वेंगुर्लेकर, संतोष वेंगुर्लेकर, सुभाष पालव, अशोक पालव, प्रकाश पालव, एस.टी.पालव, प्रकाश भिवा पालव, आपा पालव, सत्यवान पालव, वैभव पालव, सागर पालव, धनाजी पालव, गुरुदास पालव, विश्राम परब, गोविंद पालव, रघुनाथ पालव, संतोष पालव, मालोजी रासम, सुभाष वाळवे, अरविंद वाळवे, पांडुरंग पालव, सदानंद पालव, दीपक नाईक, गणेश गोसावी, श्रीधरनाथ गोसावी, काशीराम गोसावी व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आपल्या पक्षात सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही शेवटी दत्ता सामंत यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बाबुराव पालव यांनी केले तर आभार सत्यवान मानाजी पालव यांनी मानले.

rapan bottom