Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार

परशुराम उपरकर यांचा इशारा

पिंगुळी बनलेय अंमली पदार्थांचे हब : उपरकर

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन प्रकारची गॅंग कार्यरत असल्याचे उबाठा शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या विरोधात जनतेला सोबत घेऊन घेऊन रस्त्यावर उतरु असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.


     सिंधुदुर्गातून गोव्यात अंमली पदार्थाची वाहतूक करतानाची पहिली मोठी कारवाई बांदा येथे झाली. आजची तरुण पिढी ही अमली पदार्थ व अनैतिक धंद्याच्या विळख्यात सापडलेली आहे, या अनुषंगाने आज श्री उपरकर यांनी येथील शिवसेना शाखेत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, अतुल बंगे, संतोष शिरसाट, दीपक गावडे, बाबल गावडे, कृष्णा धुरी, गोट्या चव्हाण,  नितीन सावंत आदी उपस्थित होते.


   यावेळी बोलताना श्री उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील अंमली पदार्थ व अनैतिक धंदे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून  पालकमंत्र्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाला पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे सर्रास दिसत आहे. या ठिकाणी पालकमंत्री सपशेल फेल ठरले आहेत. जिल्ह्यात राजरोसपणे अमली पदार्थ वाहतूक अनैतिक धंदे  होत आहेत.  कुडाळ तालुक्यातील पिंगुळी हे अंमली पदार्थाचे हब बनलेले आहे. कुडाळमधून अमली पदार्थांचा  पुरवठा केला जात आहे. मात्र पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. एमआयडीसी येथे अनेक परप्रांतीय भंगारच्या नावाखाली ड्रग्स दारूचा धंदा मोठ्या प्रमाणात करत आहेत. आलिशान  गाड्यामधून ही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना पोलीस यंत्रणेतून कोणतीच कारवाई होत नाही. एकदरीच दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या या अमली पदार्थ वाहतुकीला पोलिसांची भीती नसल्याचे चित्र यावेळी दिसत आहे. जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशा तीन गँग या ठिकाणी वावरत आहेत.  पालकमंत्री यांच्या आदेशानुसार मधल्या काळात जुगार आठ दिवस बंद केला गेला. मात्र हाच जुगार मटका पुन्हा जोमाने सुरू असून आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे. म्हापण मध्ये जी दारू पकडली ती एका बीजेपीच्या कार्यकर्त्याची होती, असे श्री उपरकर यांनी सांगितले. दरम्यान या अंमली पदार्थ, जुगार,मटका अनैतिक धंदे या विरोधात  जनतेला सोबत घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा श्री उपरकर यांनी दिला.

rapan bottom