Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

जुगाराच्या पटावर पोलिसांची धाड…

जुगाराच्या पटावर पोलिसांची धाड…

कार, दुचाकी, मोबाईल, रोखरक्कमेसेह लाखोंचा मुद्देमाल जप्त : 15 जणांवर गुन्हे दाखल


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांची खोटले माळरानावर मध्यरात्री कारवाई

मालवण : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर धाड टाकली. या कारवाईत फोरव्हीलर (4) , मोबाईल, दुचाकी (1) यांसह 1 लाख 43 हजार रोख रक्कम व लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील 15 संशयित आरोपी विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे आशिष यशवंत जामदार यांनी दिली आहे.

1 एप्रिल रोजी रात्री 1.10 वा. खोटले धनगरवाडी, मालवण येथे अंदर बाहर पट जुगारावर पैसे लावून काहीजण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी याठिकाणी धाड टाकली. सुमारे 37 लाख 58 हजार 690 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम 1 लाख 43 हजार 390 तसेच मोबाईल फोन, चार चाकी कार 4, मोटार सायकल 1 जप्त करण्यात आले.

जुगार खेळत असल्याप्रकरणी 15 संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात गुरुनाथ साबाजी नाईक (वय 22) रा. आरोस, गिरोबा वाडी सावंतवाडी, रामचंद्र सदाशिव गुरसाळे (वय 63) रा. पटकी देवी जवळ कणकवली, महेश सुंदर आंबेरकर (वय 40) कणकवली, संजय श्रीधर साळगावकर (वय 50) रा. कट्टा गुरमवाडी मालवण, गणेश सोमा पालव (वय 37) रा. मसुरे मालवण, बाळकृष्ण पांडुरंग वर्धम (वय 68) रा. सातोसे तालुका सावंतवाडी, संतोष बाळकृष्ण कुडतरकर (वय 53) रा. माणगाव कुडाळ, सुरेश श्रीधर कवटणकर (वय 52) रा. कवठणी सावंतवाडी, रोहित राजेंद्र गराटे (वय 29) रा. कासर्डे कणकवली, भीमसेन तुळजाराम इंगळे (वय 41 वर्षे) रा. कलमठ कणकवली, प्रशांत प्रकाश चव्हाण (वय 40) रा. मसुरे मालवण, तुषार नंदकुमार मसुरकर (वय 34) रा. कलमठ कणकवली, अक्षय नारायण चव्हाण (वय 35) रा. कुमामे मालवण, संदीप गोळवणकर रा. कांबळे गल्ली कणकवली, तुकाराम खरात रा. कलमठ कणकवली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहेत.

rapan bottom