Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवणच्या अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विशेष सन्मान

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवणच्या अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विशेष सन्मान

बाँबे ब्लड ग्रुप ऑरगनायझर तासगाव सांगली या संस्थेच्या वतीने गौरव

सिंधुदुर्ग : बाँबे ब्लड ग्रुप ऑरगनायझर तासगाव सांगली या संस्थेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवणच्या अध्यक्ष सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचा विशेष सन्मान केला आहे.

ही संस्था जागतीक अत्यंत दुर्मिळात दुर्मीळ रक्तगट बाँब्ल ब्लडग्रुप या रक्तगटाविषयी विशेष कार्य करते, देशातील व जगातील या रक्तगटाचे सदस्यांची ही संघटना आहे. आजवर या संस्थेने अनेक रुग्णाचे प्राण या रक्तगटाचा पुरवठा करुन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या संस्थेचे संस्थापक व बाँब्बे ब्लडग्रुपचे (Oh किंवा Hh) दाता विक्रमजी यादव यांनी रक्तदान केले आहे.

विक्रमजी यादव यांनी नेहमीच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेतली आहे, तसेच यापूर्वी संस्थेचा सन्मानपत्र देऊन केला आहे. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतष्ठान- शाखा मालवण तालुका अध्यक्ष श्रीमती शिल्पा खोत यांच्या कार्याची दखल घेत आपल्या संस्थेमार्फत गौरव करण्यात आला आहे.

सौ.शिल्पा खोत यांनी रक्तदान देहदान अवयवदान व रुग्णमित्र म्हणून संस्थेच्या उद्देशांशी निगडीत दिलेले योगदान लक्षात घेऊन, या पुरस्काराकरिता त्यांची निवड करण्यात आली. एका महिला कार्यकर्तीने रक्तदान क्षेत्रात मिळवलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी श्रीम.शिल्पा खोत यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे

rapan bottom