कसाल : न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल या महाविद्यालयाला आमदार निरंजन डावखरे यांच्या सौजन्याने एक इंटरॅक्टिव बोर्ड प्रदान करण्यात आला. तसेच, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल यांच्या सहकार्यातून अजून एक इंटरऍक्टिव्ह बोर्ड शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आला. याचा उद्घाटन सोहळा प्रशालेमध्ये 21 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. या डिजिटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करून शिक्षण घेता येणार आहे.
या बोर्डच्या उद्घाटनाचा मान इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. आर्या हरमलकर हिला देण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस , भगीरथ प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संस्थेचे अध्यक्ष भाई सावंत, सचिव यशवंत परब, शाळा समिती अध्यक्ष व रोटरीचे पास्ट प्रेसिडेंट नवीन बांदेकर, रोटरी क्लब सचिव अरुण मालणकर, खजिनदार दीपक आळवे, उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण, संस्थेचे संचालक अवधूत मालनकर, शाळा समिती सदस्य विवेक बालम, विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम मळगावकर , पर्यवेक्षिका सौ. बालम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. प्रसाद देवधर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा उपयोग करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, रोटरी क्लब अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस आणि प्रभाकर सावंत यांनी शिक्षकांना प्रेरणादायी विचार मांडून डिजिटल शिक्षणाच्या फायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्रेकर सर यांनी केले, तर मुख्याध्यापक उत्तम माळगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

