मालवण : मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री भगवती देवी मंदिर धामापूर येथे श्री राम नवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 30 मार्च रोजी श्रीची विशेष पूजा त्यानंतर वर्षफल वाचन, रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक रात्रौ ९:३० वाजता नाईक मोचेमाणकर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
सोमवार दिनांक 21 मार्च रोजी श्रीची विशेष पूजा रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक, रात्रौ ९:३० आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरुर प्रस्तुत "तरंगत्या बेटावर" ही एकांकिका सादर होणार आहे.
मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी श्रीची विशेष पूजा, रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक, रात्रौ ९:३० वाजता रंगप्रसंग कोल्हापूर प्रस्तुत "अल्मोस्ट डेड" ही एकांकिका सादर होणार आहे.
बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी श्रीची विशेष पूजा, त्यानंतर रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक रात्रौ ९:३० वाजता परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर प्रस्तुत "बॅलेन्स" ही एकांकिका सादर होणार आहे.
गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी श्रीची विशेष पूजा, रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक, रात्रौ ९:३० वाजता ह.भ. प. श्री विश्वनाथ तथा भाऊ नाईक यांचे "त्रिंबकेश्वर" अख्यानावर कीर्तन होणार आहे.
शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी श्रीची विशेष पूजा, रात्रौ ८:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक, रात्रौ ९:३० वाजता ह. भ.प. आरती बापट नारिंग्रे यांचे "विष्णुदत्त " अख्यानावर कीर्तन होणार आहे.
शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी श्री ची विशेष पूजा, रात्रौ ८:३०वाजता पुराण व पालखी मिरवणूक, रात्रौ ९:३० वाजता ह.भ.पं. श्री हरिहर नातू, पुणे यांचे "कौशिकी" अवतार अख्यानावर कीर्तन होणार आहे.
रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी श्री उत्सव पूजा सकाळी १०:३० वाजता पुराण वाचन, दुपारी ११ वाजता ह. भ. प. श्री हरिहर नातू, पुणे यांचे राम जन्मावर आधारित कीर्तन होणार आहे. दुपारी १२: ३९ वाजता राम जन्मोत्सव झाल्यानंतर दुपारी १:३० वाजता श्री ची पालखी मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी ४ वाजता स्थानिक भजने होणार आहेत. रात्रौ ९:३० वाजता पुराण व पालखी मिरवणूक झाल्यानंतर रात्रौ १२:३० वाजता जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळ, आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी श्री ची उत्सव पूजा दुपारी ११ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, रात्रौ १०:३० वाजता श्रीची पालखी मिरवणूक झाल्यानंतर रात्रौ ११:३० वाजता प्रसादराव गाडगीळ, गोवा यांचे कीर्तन होणार आहे. रात्रौ १२ :३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सकाळी पाच वाजता प्रसादराव गाडगिळ, गोवा यांचे कीर्तन व हनुमान जन्मोत्सव होणार आहे. सकाळी रात्रौ ६:३० वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. सकाळी रात्रौ ७:३० वाजता श्री ची आरती व प्रसाद वाटप होणार आहे.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट धामापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

