Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

जि. प. कर्मचाऱ्यांची गुढी पाडव्याची सुट्टी रद्द होईल का?

जि. प. कर्मचाऱ्यांची गुढी पाडव्याची सुट्टी रद्द होईल का?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी असल्याचे कारण देत जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सर्व कर्मचाऱ्यांना पुढील तीन दिवस कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच तिन दिवसांमध्ये येत्या रविवारी हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा होणार आहे. अशातच मुख्याधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करणेवर हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळात निर्बंध येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग मार्फत अख्ख्या महाराष्ट्रात स्वतःला हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी हिंदु सणावर घातलेले निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे.

rapan bottom