संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील चुनवरे तळेवाडी येथील रहिवासी कै.श्री. राजाराम सखाराम परब यांचे वयाच्या १०२ या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
तळे वाडी येथील २६ मार्चला ( बुधवारी ) दुपारी दिड वाजता स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. राजाराम सखाराम परब. हे स्वभावाने अत्यंत प्रेमळ मनमिळावू व सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांच्या जाण्याने चुनवरे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली. जावई. नातवंडे. पुतणे. पुतणी. सुना. असा परिवार आहे.
चुनवरे गावचे प्रसिद्ध समाजसेवक श्री. अमोल तुकाराम परब. यांचे ते काका होते.

