Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सौ. मिताली कोरगावकर यांना आचरा ज्येष्ठ नागरिक संघाचा महिला गौरव पुरस्कार प्रदान

सौ. मिताली कोरगावकर यांना आचरा ज्येष्ठ नागरिक संघाचा महिला गौरव पुरस्कार प्रदान

मालवण | प्रतिनिधी : आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, (फेस्कॉम संलग्न) तर्फे देण्यात येणारा महिला गौरव पुरस्कार आचरा पिरावाडी येथील उद्योजिका सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांना आचरा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक मेळाव्यात डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. आचरा पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा आचरा येथील लौकिक सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष दिघे, अध्यक्षस्थानी आचरा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, उपाध्यक्ष सुरेश गावकर, जॅकारीएस फर्नांडिस, महिला आघाडीच्या मनाली फाटक, बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर, उद्योजक सचिन कुबल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. मिताली कोरगांवकर यांना डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुरस्कार मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. मिताली कोरगावकर म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिक संघाने दिलेल्या पुरस्काराने मला ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाले असून आणखी काम करण्यास प्रोत्साहन व बळ मिळाले आहे. आपल्या यशात आचरा गावातील महिला बचत गटाच्या महिला, आचरा दक्षता समिती, यशराज प्रेरणा ग्रुप, तिरूमला क्रेडिट सोसायटी, पती प्रशांत कोरगावकर, मुलगी गौरी कोरगावकर व भाऊ सचिन कुबल तसेच आचरा ग्रामस्थ यांचे योगदान महत्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.यावेळी डॉ. सुभाष दिघे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजारांनी खचून न जाता नेहमी आनंदी आणि हसत कार्यरत आयुष्य जगण्याचा सल्ला डॉ. दिघे यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकाचा स्वरयात्रा हा कार्यक्रम संपन्न झाला.

rapan bottom