मालवण येथील जुन्या बसस्थानक इमारतीच्या स्लबचा काही भाग कोसळून महिला जखमी : मदतीसाठी यतीन खोत यांची धाव
मालवण : मालवण येथील जुन्या बसस्थानक इमारतीच्या स्लबचा काही भाग कोसळून एक प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. एसटी अधिकारी, कर्मचारी यांनी जखमी महिलेला तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर महिलेची तब्बेत स्थिर होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी महिलेची नातेवाईक व एसटी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
काही मदत लागल्यास सांगा आम्ही सोबत आहोत असे जखमी महिलेच्या नातेवाईकांना सांगितले. तसेच बसस्थानक येथे एसटी अधिकारी यांच्याकडूनही यतीन खोत यांनी माहिती घेतली.
दरम्यान, एसटी प्रशासनाने जखमी महिलेला औषधउपचार तसेच आवश्यक मदत केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर महिलेला घरी सोडण्यात आले. तसेच अन्य काही औषध उपचार मदत लागल्यास एसटी प्रशासन सोबत असल्याचे सांगितले.

