मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापनेचा ३ रा तर मंदिराचा ७० वा वर्धापन दिन
५ ते ११ एप्रिल कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
अमित खोत | मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा ७० वा वर्धापन दिन सोहळा व मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापनेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे श्रीकृष्ण मंदिर, धुरीवाडा येथे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार ७ एप्रिल रोजी रात्रौ ९ वाजता श्रीकृष्ण ग्रामस्थ धुरीवाडा यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मंगळवार ८ एप्रिल रोजी रात्रौ ठीक ९ वाजता अद्वैत क्रिएशन निर्मित, कलांकुर मालवण प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी नाटक "प्रेमाचा झांगडगुत्ता" सादर होणार आहे.
बुधवार ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता विष्णू सहस्त्रनाम विधी पूजा पाठ होणार आहे. रात्रौ ठीक ९ वाजता अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ, साळेल, बुवा अंकिता गावडे व श्री स्वामी नवतरुणी भजन मंडळ, लोरे नरामवाडी कणकवली, बुवा रिया मेस्त्री यांचा महिला 20-20 डबल बारी सामना होणार आहे.
गुरुवार १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मूर्तीची पूजा व अभिषेक त्यानंतर सकाळी ९ वाजता धार्मिक विधी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मुंबई यांचे संगीत भजन होणार आहे. रात्रौ ठीक ९ वाजता दामोदर तोडणकर यांचा ट्रिकसिन युक्त "पंढरीची वारी" हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.
शुक्रवार ११ एप्रिल रोजी रात्रौ ठीक ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धुरीवाडा मालवण व सुनीता देवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर, मालवण यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा यांच्यावतीने करण्यात आले आहे

