Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भुईबावडा येथील 'सरताखेळ' २९ मार्चला

भुईबावडा येथील 'सरताखेळ' २९ मार्चला

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

वैभववाडी | प्रतिनिधी : कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव म्हणून ख्याती असणारा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील शिमगोत्सवाची सांगता शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सरत्या खेळाने होणार आहे.


नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावचा होळीपासून सुरू झालेला हा शिमगा उत्सव सरता खेळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लळीताचे अनोखे प्रकार या ठिकाणी भक्त भाविकांना पहावयास मिळतात. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित असतात. पालखी मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालात न्हाहून जाणारी रात्र खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडणारी असते.
शुक्रवार दिनांक २८ रोजी सकाळपासून देवाचा कौल झाल्यानंतर मानकरांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या ओटी भरणे कार्यक्रम सुरू होतो. दिवसभर ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी यावेळी पहावयास मिळते. शनिवार दिनांक २९ रोजी सायंकाळी होळीच्या मांडाच्या परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावातील मानकरी व ग्रामस्थ यांच्यावतीने जत्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून येणाऱ्या भक्त भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. दि. २९ रोजी होणाऱ्या सरत्या खेळाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

rapan bottom