संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील विरण येथे वैभव नाईक वाढदिवसा निमित्ताने सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम विरण वाडकर मैदान येथे आयोजित करण्यात आला.
त्यावेळी वैभव नाईक आपले मनोगत व्यक्त करताना.गेले दहा वर्ष आमदार म्हणून काम करताना मी सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी होतो. मला जमेल तसे जनतेसाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. आज आमदार नसलो तरी कार्यकर्ते व जनतेच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा काम करण्याची संधी व उमीर्र् मला मिळत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी विरण येथे बोलताना केले. माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारपेठ येथील वाडकर मैदान येथे काल मंगळवारी रात्री नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी वैभव नाईक यांचा केक कापून तसेच फटक्यांची आतशबाजी करून आणि संगीताच्या तालावर रोंबाट नृत्याच्या साथीने वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, सुभाष धुरी, बाळा मठकर, स्वप्नील पुजारे, विजय बाबली पालव, सुरेश नेरुरकर, नाना नेरुरकर, रुपेश वर्दम, गणेश नेरुरकर, अरुण भोगले, अमित भोगले, बाळ महाभोज, भाऊ चव्हाण, कृष्णा पाटकर, विजय पालव, बाबली पालव, अनंत पाटकर, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, अक्षय नेरुरकर, अमित कुशे, प्रमोद पाटील, बंड्या वाडकर, जयेश नार्वेकर, सावंत आदी व इतर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, आज मी आमदार नसताना सुद्धा कार्यकर्त्यांकडून एवढ्या उत्साहात माझा वाढदिवस साजरा होत आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. यानिमित्त पोईप विभागातील कार्यकर्त्यांनी नेरूर येथील रोंबाट कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही आभार मानतो, असेही नाईक म्हणाले. यावेळी उपस्थित ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही मनोगते व्यक्त करत वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नेरूर येथील भव्य रोंबाट कार्यक्रम सादर झाला. यावेळी विविध पौराणिक वेशभूषा केलेली पात्रे तसेच इतर आकर्षक पात्रे यांनी सादरीकरण करत या कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक तसेच ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

