Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून डंपरचालकाची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : चौके बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या विरुद्ध बाजूने डंपर मागे आणताना झालेल्या एसटी बसच्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून डंपर चालक अंकुश चंद्रकांत चौकेकर (वय 35) रा. चौके याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी चौके बाजारपेठेतुन दुपारी 12.30 च्या दरम्याने मालवण कणकवली एसटी बस प्रवाशांसहीत जात असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभा असलेला डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर अचानक मागे घेतल्यामुळे एसटी व डंपर यात अपघात झाला. या अपघातात एसटी बसचे पुढील भागाचे नुकसान झाले. तसेच वाहक चालक व प्रवाशांना दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे एसटी चालकाने मालवण पोलीस ठाण्यात डंपर चालकाने बेपर्वाईने व हयगयीने वाहन चालवून बसच्या अपघातास व मानवी दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 279, 337 व मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये तक्रार दाखल केली होती. मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करून संशयित आरोपीविरुद्ध मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याकामी सरकारपक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती तपासकामातील त्रुटी, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व आरोपीतर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने संशयित आरोपीची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली

rapan bottom