Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

बसस्थानक जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही तात्काळ सुरु होणार

बसस्थानक जुनी इमारत पाडण्याची कार्यवाही तात्काळ सुरु होणार

काही गाळ्यांचा कोर्ट मॅटर सुरु असल्याने थांबले होती कार्यवाही : भाजपा मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

मालवण : मालवण बसस्थानक जुनी धोकादायक इमारत येथील काही गाळ्यांचा कोर्ट मॅटर सुरु असल्याने ते गाळे वगळून अन्य धोकादायक इमारतीचे बांधकाम पाडण्याची कार्यवाही प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ सुरु केली जाईल. अशी माहिती भाजपा मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

दरम्यान, नव्या पुर्ण होत असलेल्या बसस्थानक इमारतीचे लोकार्पणही पुढील महिन्यात पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होईल. असेही मोंडकर यांनी सांगितले.

मालवण येथे नवीन बस स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्यात आहे. मात्र जुन्या बस्थानकामधे भाडे तत्वावर असलेल्या कँटिंग व अन्य भाडेकरू यांचा कोर्ट मॅटर असल्याने सदर जुन्या बस स्थानाकाचे बांधकाम पाडण्यासाठी अडचणी येत होत्या. यावर पर्याय म्हणून सदर न्यायप्रविष्ठ आस्थापना तशाच ठेऊन अन्य इमारत बांधकाम पाडण्यासंदर्भात परवानगी मिळावी. यासाठी विभागीय इंजिनिअर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तात्काळ जुने धोकादायक बसस्थानक पाडण्या संदर्भात पत्र देऊन प्रत्यक्ष काम चालू होईल अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.

दरम्यान, जुने बांधकाम पाडताना बस सेवा सुरळीत राहून प्रवाशांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी डेपो व्यवस्थापक यांनी नियोजन करणेबाबत चर्चा झाली. पुढील महिन्यात पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन बसस्थानकाचे ही लोकार्पण ही होईल असे. मोंडकर यांनी सांगितले.

rapan bottom