Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात 28 मार्चला महिला मेळावा

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात 28 मार्चला महिला मेळावा

पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांचे संयुक्त विद्यमाने आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यात 28 मार्च सकाळी 11 वा. समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचायत समिती गटाविकास अधिकारी दालन येथे आयोजित पत्रकार परिषदवेळी पंचायत समिती अधीक्षक भीमसेन पळसंबंकर, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर धनगे, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, उमेद अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळी, उमेद प्रभाग समन्वयक प्रिया धरणे, विस्तार अधिकारी व्ही के जाधव, विस्तार पीडी जाधव यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मालवण तालुक्यात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्या योजनांचे आमदार निलेश राणे याचे उपस्थितीत विविध लाभ दिलेल्या योजनांचे प्रतिकात्मक वितरण लाभार्थीना करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना अंतर्गत घराची चावी देणे तसेच घर मंजुरीचे आदेश देणे. जि.प. जिल्हा परिषद २० टक्के सेस अंतर्गत मागासवगीयांना जुने घर दुरस्ती अर्थसहाय्य, शिलाई मशीन, घरघंटी, ग्रासकटर खरेदी अर्थसहाय्य जिल्हा परिषद ५ टक्के अपंग सेस मधुन घरकुल बांधणे अर्थसहाय्य, घरघटी खरेदीसाठी अर्थसहाय्य, व अस्थिव्यंग तीन चाकी गाडी खरेदीसाठी अर्थसहाय्य पंचायती समिती सेस अंतर्गत मागसवर्गीय जुने घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, ५ टक्के सेस अंतर्गत अपंगाना घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य व १० टक्के सेस माहिला बाल कल्याण अंतर्गत महिलांना जुने घर दुरुस्ती साठी आर्थिक सहाय्य या योजनेंचे लाभार्थीना मंजुर लाभाचे आदेशाचे वितरण करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन महिल्या मेळाव्यात करण्यात आलेले आहे.

तसेच महिलांना कायदेविषयक, उदयोजगता व आरोग्य विषयावर तज्ञाकडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील महिलानी या महिला मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

rapan bottom