Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

महिला प्रवासी गंभीर जखमी

महिला प्रवासी गंभीर जखमी

मालवण बस स्थानक जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला

मालवण | प्रतिनिधी : मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवासाच्या डोक्यावर पडल्याची घटना बुधवारी घडली. यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही वर्षांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळून एक प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. इमारतीच्या काही भागात सुरक्षा आच्छादने लावून सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्या बाजूला दुसऱ्या ठिकाणचा स्लॅब भाग कोसळला.

सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवासी जुन्या इमारतीतच आपल्या बसची वाट पाहत बसतात. सकाळीच बेळगाव येथून मालवणात आलेले एक दांपत्य आचरा येथे असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. आचरा बस फेरीची वाट पाहत बसले असता अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला. यात ती गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला एसटीच्या अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर होती

rapan bottom