युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांचे मालवण पोलिसांना निवेदन
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग युवासेनेकडून कुणाल कामरा याच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. कुणाल याने जाहीर माफी मागावी, अन्यथा युवासेना आक्रमक भूमिका घेईल व तीव्र आंदोलन करेल. अश्या आशयाचे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांनी मालवण पोलिसांना दिले आहे.
स्टैंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारण यांची खिल्ली उडविली आहे. कुणाल कामरा याने एक कविता लिहिली आहे. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर एका शोमध्ये कुणालने भाष्य करत विडंबनात्मक गाणे तयार केले आहे. दरम्यान, या प्रकरणी युवासेना सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुणाल कामरा याने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. या वक्तव्याबद्दल कुणाल याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, तसे न झाल्यास युवासेना आक्रमक भूमिका घेईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांच्या वतीने मालवण पोलिसांना देण्यात आले आहे.
यावेळी युवासेना विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, युवासेना जिल्हा सचिव संग्राम साळसकर, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, तालुका प्रमुख तथागत मालवणकर, ओंकार चव्हाण, राहुल आव्हाड, प्रतीक गावडे,गौरव लाकम,
रोहन तावडे उपस्थित होते.

