Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द !

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द !

कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी विनायक पाटील यांची ग्वाही

शिक्षक समितीची श्री. पाटील यांचे सोबत सहविचार सभा

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपण कटिबध्द राहू असे आश्वासन कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी यशवंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सहविचार सभेत दिले. 31 मार्चपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक समितीला भेट मिळावी असे निवेदन देण्यात आले होते.यानुसार कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी यशवंत पाटील यांनी संघटना शिष्टमंडळासोबत सहविचार सभा घेत विविध प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कौरगावकर ,तालुकाध्यक्ष शशांक आटक ,सचिव महेश गावडे ,राज्य पदाधिकारी सचिन मदने ,चंद्रकांत अणावकर,प्रसाद वारंग,संतोष वारंग, महेश कुंभार, आपा सावंत, शैलेंद्र न्हावेलकर, सुरेखा कदम , महिला आघाडी सचिव सुगंधा अणावकर, स्वामी सावंत, धोंडी मसूरकर, अनंत राणे , बाळकृष्ण मर्गज , दत्ता तवटे आदी उपस्थित होते. तर विस्तार अधिकारी संदेश किंजवडेकर,स्वप्नाली वारंग,सुलभा देसाई,कुणाल तेंडोलकर,समीर सावंत, शिल्पा बांदेलकर , बावलेकर आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांचे खालील विवीध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली.1) दिनांक 11 मार्च 2024 रोजी घेतलेल्या नियोजित बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती त्या त्यापैकी किती विषयावर कार्यवाही झाली यावर चर्चा करण्यात आली ,2)शालार्थ पगार देयके हार्ट कॉपी मुख्याध्यापकांना मिळण्याबाबत सांगण्यात आले त्यानुसार ही हार्डकाॅफी दिली जाईल असे गशिअ यांनी सांगितले प्रशिक्षण तसेच इतर आदेश हे लेखी स्वरूपात मुख्याध्यापकांना किंवा संबंधित शिक्षकांना देण्यात यावेत यापुढे असे कार्यवाही केली जाईल असे गटशिक्षण अधिकारी महोदय यांनी सांगितले, 3)आर्थिक देयके एमडीएम तसेच चार टक्के सादिल, समग्र शिक्षा अभियान व इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक देयके शाळेच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी मुख्याध्यापक यांना देण्यात यावी अशी आग्रही भूमिका संघटनेने मांडली व त्यास माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी अनुमती दिली ,4)शालेय पोषण आहार पुरवठा व येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या वेळेत धान्य पुरवठा करण्यात यावा पुरेसा धान्य पुरवठा प्रत्येक शाळेत पोहोचवावा धान्याचा दर्जा चांगला असावा या बाबींवर चर्चा करण्यात आली,5)एमडीएम ॲप सध्या बंद असून काहीजणांच्या मोबाईल मध्ये ते ओपन होत नाही त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची दररोजची हजेरी भरण्याचे काही शाळांचे राहिले आहे तरी संबंधित यंत्रणेला मागील उपस्थिती भरण्यासाठी टॅप ओपन करून देण्यात यावा असे सांगण्यात आले ,6)शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेढी निवड श्रेणी प्रस्ताव जिल्ह्याला किती पाठवण्यात आले त्याचप्रमाणे मंजूर होऊन किती आले याचा आढावा घेण्यात आला तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षकांच्या फरकाची रक्कम लवकरात लवकर करण्यात यावी असे सांगण्यात आले,8) शिक्षकांची सेवापुस्तके अपडेट करण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये दुपार सत्रामध्ये कॅम्प लावण्यात यावे व केंद्रीय नियोजन करून शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट करण्यात यावीत असे सांगितले, 9)शिक्षकांची प्रलंबित मेडिकल बिले लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ती जिल्ह्याला सादर करावी मेडिकल बिला मधील त्रुटी एकाच वेळी काढाव्यात पुन्हा पुन्हा त्रुटी काढून बिल मागे जाऊ नये याबाबत जिल्ह्याला आपण कळवावे असे सांगितले ,10) शिक्षकांना करावे लागणाऱ्या ऑनलाईन कामाबाबत व त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली 128 मानके भरत असताना शिक्षकांना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे सदरील काम कोणत्याही परिस्थितीत लवकर होणार नाही स्कोप ची माहिती भरण्यासंदर्भात प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात यावे ,11) केंद्रांतर्गत शिक्षकांना कामगिरी पाठवत असताना परस्पर मुख्याध्यापकांना पत्र देऊन कामगिरी शिक्षक न पाठवता केंद्रप्रमुखांचे पत्र कामगिरीवर जाण्यासाठी पाठवण्यात यावे, 12)शाळा सोडल्याचा दुय्यम दाखला देत असताना नेमका बॉण्ड पेपर घ्यावा का व किती रुपये घेण्यात यावे या संदर्भात शाळांना पत्र पाठवण्यात यावे,13) नवनियुक्त 19 शिक्षक ज्यांच्याकडे मुख्याध्यापक चार्ज आहे त्यांचे प्रशासकीय कामकाज व लेखे कसे लिहावेत या संदर्भात एक दिवसाचं मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात यावा,14)नवीन नेमण्यात आलेल्या शिक्षण सेवकांना पुढील पाच वाढीव महिन्यासंदर्भातले पत्र मुख्याध्यापकांना मिळावे,15) कुडाळ तालुक्यातून मे 2023 रोजी वेंगुर्ले तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट करून लवकरात लवकर पाठवण्यात यावी ,16)सर्व गणवेश प्राप्त झाल्याशिवाय संबंधितांचे वेंडर बिल पाठवण्यात येणार नाही प्रशिक्षणासाठी शिक्षकांना जिल्हास्तरावर किंवा तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक न घेता बीआरसी मधील स्टॉप त्यासाठी वापरण्यात यावा मुलांचे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांना कोणत्याही प्रकारे जिल्हास्तरावर तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शन म्हणून घेऊनयेत 17)एलआयसीचे शिक्षकांच्या पगारातून कट होणारी पैसे त्या महिन्यात एलआयसी कार्यालयाकडे जमा व्हावेत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये,18) सहाव्या वेतन आयोग यामधील त्रुटीमध्ये 17 शिक्षकांच्या संदर्भात पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे तीन महिने अगोदरच प्रस्ताव तयार करून सेवा पुस्तक अपडेट करून जिल्ह्याला पाठवण्यात यावे 19)याशिवाय शिक्षकांच्या वैयक्तिक प्रश्न संदर्भातही चर्चा करण्यात आली या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून आपल्या स्तरावरून समस्या सोडवल्या जातील असे माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले .

इस्त्रो सफरीसाठी जिल्हास्तरावर गुणवत्ता निकष घ्यावेत भारतरत्न डाॅ ए पी जे अब्दूल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेतील तालुकास्तरावरील पहिले तीन विद्यार्थी निवड प्रक्रीये ऐवजी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार करून जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना इस्त्रो सफरीवर नेण्यात यावे अशी संघटनेने आग्रही भूमिका मांडली. शेवटी सचिव महेश गावडे यांनी कुडाळ गटशिक्षण कार्यालयाचे आभार व्यक्त केले.

rapan bottom