कुडाळ : युवा सेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे दिनांक 27 मार्च रोजी सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब शुगर रक्तगट तपासणी, बालरोग तपासणी, कान,नाक, घसा तपासणी, अस्थिभंग बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी ,अस्ति व्यंग दंत तपासणी अशा विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येणार आहेत. तसेच कुडाळ शहरातील वयोवृद्ध व अपंग बांधवांना ने आन करण्याची व्यवस्था देखील युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अमित राणे 9158155889 व गुरु गडकर9579651247 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती कुडाळ तालुका युवा सेना प्रमुख योगेश धुरी व कुडाळ शहर युवा सेना प्रमुख संदीप महाडेश्वर यांच्यावतीने देण्यात आली.

