Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मळगाव येथील शारदा विद्यालयाचे अब्दुल कलाम टॅलेंट सर्च, भारत टॅलेंट सर्च, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश

मळगाव येथील शारदा विद्यालयाचे अब्दुल कलाम टॅलेंट सर्च, भारत टॅलेंट सर्च, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश

सावंतवाडी : मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा व भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत ११ विद्यार्थी, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत १ विद्यार्थी, भारत टॅलेंट सर्च परीक्षेत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या व त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांच्या सत्काराचे काल सोमवारी प्रशालेत आयोजन करण्यात आले होते. समितीच्यावतीने पेन व पुष्गुच्छ देऊन या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरीता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्ताराम मळगावकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, स्वरा वारंग, पालक प्रवीण डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मुलांना मार्गदर्शन केलेल्या सर्व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने आभार व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

rapan bottom