Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

बिनशेती सारा दंड व प्रत्येक दिवशीच्या दंड वसुलीस स्थगिती मिळावी

बिनशेती सारा दंड व प्रत्येक दिवशीच्या दंड वसुलीस स्थगिती मिळावी

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

मालवण | प्रतिनिधी : पर्यटन प्रकल्पांसाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आकारात असलेला बिनशेती सारा दंड वसुली तसेच प्रत्येक दिवशीचा दंड वसुलीस स्थगिती मिळावी. या मागणीचे निवेदन तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना पर्यटन व्यवसायिकांच्या वतीने देण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, रवींद्र खानविलकर, देवानंद लोकेगावकर यांसह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र, नदी किनारी बांधलेल्या इमारतीनां बिनशेती न केल्यामुळे शेतसारा व अकृषिक वापर केल्याचा अवाजवी गैर आकारणीच्या दंडाच्या नोटीसा देण्यात येत आहेत. यासंदर्भात 13 ऑगस्ट 2024 रोजी ओरोस येथील जनता दरबारामध्ये निवेदन दिलेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दंड वसुलीसाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. आणि त्यानंतर होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर व दंड माफ करण्यात येईल असे सांगितले होते. तरी जिह्यातील पर्यटन व्यावसायिकांना या दंडात्मक कारवाईतून तसेच महसूल विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या दिवसा 30 रुपये ते 100 रुपये वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आपल्या माध्यमातून देण्यात यावे ही नम्र विनंती. अश्या मागणीचे निवेदन पर्यटन व्यवसायिकानी पालकमंत्री नितेश राणे यांना दिले आहे.

rapan bottom