Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कुडाळमध्ये ११७ प्रकरणे तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कुडाळमध्ये ११७ प्रकरणे तडजोडीने निकाली

निलेश जोशी | कुडाळ : येथील लोक अदालतीत एकूण ११७ प्रकरणे तडजोडीने निकाली असुन १४ लाख ७३ हजार ३८८ एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. या राष्टीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरुपाची एकूण ७८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी.ए. कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी अॅड आर.डी.बिले, अॅड एस. जी. मळगांवकर अॅड अजिंक्य बिले व न्यायालयाचे सहायक अधिक्षक, वरीष्ठ लिपीक व कनिष्ठ लिपीक उपस्थित होते.

या राष्टीय लोक अदालतीचे काम पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश, कुडाळ जी.ए. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व अॅड आर.डी. बिले, अॅड एस.जी. मळगांवकर यांच्या उपस्थितीत पार पाडले. या राष्टीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी स्वरुपाची एकूण ७८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७ प्रकरणे निकाली वादपूर्व १०४९ प्रकरणांपैकी १०० प्रकरणे निकाली एकूण ११२७ प्रकरणांपैकी ११७ प्रकरणे निकाली निघून १४,७३,३८८/- एवढया रक्कमेची वसुली करण्यात आली.

राष्टीय लोकअदालत यशस्वी करणेसाठी बॅक ऑफ इंडीया, स्टेट बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे शाखाधिकारी तसेच विज वितरण कंपनी, भारत संचार निगम, नगरपंचायत यांचे लेखापाल तसेच ग्रमसेवक तेर्सेबांबर्डे, केरवडे, पुळास व पिंगुळी उपस्थित होते. राष्टीय लोक अदालतीचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सी.एस. नाईक, एस.डब्लू. पई तसेच न्यायालयाचे कर्मचारी लघुलेखक.एल.डी. सावंत, वरीष्ठ लिपीक आर.टी. आरेकर, एम. बी. भाटकर, तसेच कनिष्ठ लिपीक सौ. नाडकर्णी ओ. ओ.परब, एच.ए. कारेकर, डी.आर. घाडीगांवकर शिपाई श्री.प्रभु, श्री. चव्हाण यांनी परीश्रम घेतले.

या राष्टीय लोकअदालतीचे औचित्य साधुन २२ मार्च जागतिक जल दिन हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अॅड अजिक्य बिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

rapan bottom