सावंतवाडी : राम नवमीचे औचित्य साधुन श्री देवी माऊली मंदिर न्हावेली येथे शनिवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख रु.५००१/- व चषक, द्वितीय पारितोषिक रोख रु.३००१/- व चषक, तृतीय पारितोषिक रोख रु.२००१/- व चषक प्रथम उत्तेजनार्थ रोख रु. १५०१/- व चषक, द्वितीय उत्तेजनार्थ रोख रु.१००१/- व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हामोनियम, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट गजर यांना प्रत्येकी रोख रु. ५००/- व चषक आणि सहभागी भजन मंडळाना सहभाग प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहेत. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ८ संघाना या स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. इच्छूक भजन मंडळांनी १ एप्रिलपर्यंत अजय नाईक-७९७२७६१९६८, रोहित निर्गुण-७८२३०१२५८२ यांच्याशी संपर्क करून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रामनवमीनिमित्त न्हावेली येथे ५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
