संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी पाहिले काम
मालवण | प्रतिनिधी : वायरी येथे घरफोडी प्रकरणी पोलीस कोठाडीत असलेल्या दोघा संशयीतांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोघां संशयितांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
संशयित आरोपींविरुद्ध मालवण पोलिस ठाण्यात 16 मार्च रोजी भारतीय न्याय्य संहिता कलम 331(4) व 3(5) अन्वये संगनमताने रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन संशयित आरोपीं पैकी एकजण फरार आहे.
दरम्यान दोघा संशयीत आरोपीना पोलिसांनी 18 मार्च रोजी अटक करून मे. मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयित आरोपींना तपासासठी पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडी मुदत संपल्यानंतर 21 मार्च रोजी दोघा संशयीतांना मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर संशयित आरोपींच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयित आरोपींना प्रत्येकी 20,000/- रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यांनंतर दोघांही संशितांची मुक्तता करण्यात आली

