संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने रात्रौ ठीक ९ वाजता आयोजन
मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर येथे संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी "छावा" या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. शनिवार दिनांक 22 मार्च रोजी रात्रौ ठीक ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर पटांगण या ठिकाणी या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे.
तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या मोफत चित्रपट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

