वा! चित्राताई वाघ वा! : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे कौतुकोद्गार
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या 15 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणा-यांना आपण चव्हाठयावर आणले. आपल्याला विरोध करणा-यांच्याही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई! असे कौतुकोद्गार माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहेत.

