Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

आमदार निलेश राणे यांचे पत्र अन् नेरूर वाघचौडी येथील तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण….

आमदार निलेश राणे यांचे पत्र अन् नेरूर वाघचौडी येथील तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण….

कुडाळ : सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते. परंतु काही कारणास्तव सदर काम गेली तीन वर्षं रखडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे वाघचौडी मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्यात न झाल्याने गाडी चालवताना मोठी समस्या निर्माण होत होती.

ग्रामस्थ निवेदन दिले मात्र सदर रस्ता मंजूर असुनही होत नव्हता. ही बाब ग्रामस्थांच्या वतीने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या कानावर विषय घातला. आमदार यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व गटविकास अधिकारी कुडाळ यांना लेखी पत्र देत सदर रस्ता अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे करण्यात यावा असा आदेश काढला व रस्ता पुर्ण झाला. राखडलेला रस्ता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण झाल्याने नेरुर वाघचौडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. आमदार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेवून ही आभार मानण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

rapan bottom