Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

…तर खासगी बसेसची नियमबाह्य वाहतूक मनसे रोखणार !

…तर खासगी बसेसची नियमबाह्य वाहतूक मनसे रोखणार !

उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा


निलेश जोशी | कुडाळ :
खासगी लक्झरी बसद्वारे विनापरवाना मालवाहतूक विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसे वाहतूक सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसेच्या मागणीनंतर जाग येऊन स्थानिक बुकिंग एजंट पाठोपाठ मालवाहक संघटना सुद्धा खासगी बस मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान परिवहन विभाग सिंधुदुर्ग मार्फत नियमानुसार योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून नियमबाह्य वाहतूक रोखली जाईल असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे की, खासगी बस द्वारे होणाऱ्या विनापरवाना मालवाहतुकीवर कारवाई करून अवाच्यासव्वा वाढलेले तिकीट दर नियंत्रित करावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिवहन विभागास इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी गुरुवारी सकाळी आरटीओ चेक पोस्ट बांदा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे विजय जांभळे यांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला.


मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई खासगी बस मधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना मालाची वाहतूक होत आहे. मालाची वाहतूक गाडीच्या सीट वरून, स्लीपर कोचवरून सुद्धा होते. यामुळे याचा परिणाम गाड्यांच्या तिकीट दरावर होतो व गाड्यांच्या तिकिटाचे दर येते जाते दोन हजार , तीन हजार आणि चार हजार वर पोहोचतात. याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बुकिंग एजंटला सीटवरून मालवाहतूक केल्यामुळे बुकिंग साठी सीट सुद्धा उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे शासनास दरवर्षी विविध टॅक्स भरून चालणाऱ्या मालवाहू गाड्यांना भाडे मिळणे मुश्किल झाले आहे.


याच कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने परिवहनचे सिंधुदुर्ग जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांना निवेदन देत सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती.
खाजगी बस मालकांच्या मनमानीवर आरटीओ मार्फत योग्य कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास मदत म्हणून रस्त्यावर उतरून विनापरवाना मालवाहतूक रोखली जाईल असा थेट इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.

rapan bottom