सावंतवाडी : लोकमान्य एज्युकेशन कोकण विभाग, सावंतवाडी यांच्यावतीने रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या - वेळेमध्ये देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, सावंतवाडी येथे बी. एड. सीईटी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये बी. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हे शिबीर मोफत असून अधिक माहितीसाठी योगेंद्र यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

