Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

महायुतीतर्फे कुडाळमध्ये २९ मार्चला रोबांट आणि राधानृत्य स्पर्धा

महायुतीतर्फे कुडाळमध्ये २९ मार्चला रोबांट आणि राधानृत्य स्पर्धा

३० मार्चला भव्य शोभायात्रेचे आयोजन

काका कुडाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ : कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतुन २९ व ३० मार्चला कुडाळ येथे भव्य रोबांट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  कोकणात अनेक सणांमध्ये शिमगोत्सव महत्त्वाचा मानला  जातो. पण हा सण ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरी भागात या रोबांट व राधानृत्य लोककलेचा प्रसार प्रचार व्हावा, स्पर्धेच्या माध्यमातून ही कला अधिक बहरत जावी, हा उदात्त दूरदृष्टीकोन ठेवून महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या  मार्गदर्शनाखाली 29 मार्चला येथील तहसीलदार नजिकच्या शासकीय मैदानावर सायंकाळी सहा वाजता रोंबाट व राधानृत्य या भव्य लोककला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या रकमेची पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. तसेच या कलेदरम्यान लक्षवेधी चित्ररथ या शिमगोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांची चित्ररथ बनवण्याची कला व त्यांची मेहनत पाहता स्पर्धेच्या व्यतिरिक्त या सर्व सहभागी चित्ररथांना योग्य ते मानधन दिले जाणार आहे.
दि. ३० मार्चला मराठी नवीन वर्षाचे स्वागत गुढीपाडव्याने होणार आहे. या निमित्ताने संध्याकाळी सहा वाजता आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जिल्हा बाहेरचे भव्य चित्ररथ सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व काही मंत्री यांची उपस्थिती असणार आहे.
सर्वांनी या दोन्ही दिवस चालणाऱ्या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कुडाळकर यांनी केले. यावेळी  शिवसेनेचे संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, युवा नेते दादा साईल, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, रत्नाकर जोशी, भाजपा तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदि उपस्थित होते.

rapan bottom