Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अपंगत्वावर मात करून जिद्दीने सुरु केला व्यवसाय

अपंगत्वावर मात करून जिद्दीने सुरु केला व्यवसाय

ऐनारी येथील श्रीकृष्ण ऊर्फ बाळा साईल यांची प्रेरणादायी यशोगाथा

पंकज मोरे | वैभववाडी : एका हाताने अपंगत्व, लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. तरीही खचून न जाता व कोणापुढे हात न पसरता त्यांनी अपंगत्वावर मात करून जिद्दीने कोल्ड्रींगचा व्यवसाय करत आहेत. स्वयरोजगारातून ते आर्थिकहष्ट्या स्वताच्या पायावर उभे राहिले आहेत. अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या जिद्दी दिव्यांग तरुणाचे नाव श्रीकृष्ण ऊर्फ बाळा साईल असे आहे. त्यांची जिद्द व प्रेरणादायी प्रवास धडधाकट माणसांना देखील प्रेरणादायी आहे.


वैभववाडी तालुक्यातील ऐनारी येथील श्रीकृष्ण ऊर्फ बाळा राजाराम साईल यांची घरची परिस्थिती प्रतिकूल होती. लहानपनीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी श्रीकृष्ण ऊर्फ बाळा साईल यांच्यावर पडली. घरात कर्ता पुरुष असल्याने कुटुंबाचा संपूर्ण गाडा त्याना हाकावा लागत असे. त्यानी जेमतेम शिक्षण घेऊन सन १९९० मध्ये मुंबई गाठली. एका खाजगी कंपनीत ते कामाला लागले. कंपनीत काम करत असताना आपरेट मशीन मध्ये त्यांची डाव्या हाताची बोटे तुटून त्यांना अपंगत्व आले.


मात्र अपंगत्व येऊनही ते खचून न जाता तब्बल २६ वर्षे नोकरी केली. नोकरी करत असताना साईड बिजनेस म्हणून पेपर लाईनचे काम करू लागले. त्यांना त्यावेळी नोकरीतून १८ रुपये इतका पगार मिळत असे. वसई ते सातविली असा ७ किमीचा ते दररोज प्रवास करीत असत. मुळातच त्यांना गावची ओढ, त्यातच गावाला येवून काहीतरी उद्योग करावा ही त्यांची जिद्द होती. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबई येथून नोकरी सोडून गावी आले. सन २०१५ मध्ये गावी आल्यानंतर त्यांनी अडीच एकरमध्ये काजूची लागवड केली. त्यानंतर पोल्ट्री फार्म, म्हैशी, ऊस लागवड असे उदयोग ते करत आहेत. आणि त्यात ते यशस्वी होत आहेत.


गतवर्षी पासून त्यांनी कोल्ड्रिंकची फॅक्टरी सुरु केली. फॅक्टरीमधे काही जणांच्या सहकार्याने ते फॅक्टरी चालवित आहेत. त्यांच्या मदतीला त्यांची अर्धांगिनी दोन मुलगे त्यांना मदत करत आहेत. तर एक मुलगा फुड इंजिनिअरिंगच्या व्दितीय वर्षात शिकत आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा माल सप्लाय होत आहे. फॅक्टरीमधून लेमन, स्प्राईट, आरेंज, कोकम, मँगो, जिरा सोडा, कोका कोला व सोडा या प्रोडक्शनचे उत्पादन घेत आहेत.


आज समाजात अनेक निरोगी, धडधाकट तरुण नोकरी नसल्यामुळे नाउमेद होताना दिसतात. अपंगत्वाचा बाऊ करीत काहीजण रडत बसतात. पण नाउमेद न होता. छोटा व्यवसाय करून स्वंयरोजगाराचे साधन निर्माण करता येवू शकते. हेच श्रीकृष्ण ऊर्फ बाळा साईल यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आत्माविश्वासाने काम केल्यावर कोणीही यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो.

rapan bottom