Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना ठाणे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना ठाणे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

मसुरे | प्रतिनिधी : कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना पंचशील ट्रस्ट ओरोस,आदर्श नगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने शीला खोटलेकर स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन ठाणे पश्चिम येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भंते संघरत्न, ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर, वृंदा पेंडूरकर अजित सोनवडेकर, सिद्धार्थ जंगम, पराग तांबे, अमर जाधव, शितल पवार, दिनेश जाधव, आणि पंचशील ट्रस्टचे सदस्य सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना त्रिशाला कदम म्हणाल्यात माझ्या शैक्षणिक सेवेच्या कार्याची दखल घेऊन आज माझा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जो गौरव करण्यात आला याचे सर्व श्रेय मी माझे सर्व विद्यार्थी, सर्व सहकारी शिक्षक, सर्व तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, माझे बांधव, ग्रामस्थ, पालक वर्ग आणि माझ्या परिवाराला देईन. मी प्रामाणिकपणे शैक्षणिक योगदान प्रत्येक प्रशालेमध्ये देत गेले होते. माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले हाच माझा खरा बहुमान आजपर्यंत मी समजत आले. पंचशीला ट्रस्ट या संस्थेचे कार्य खूप महान असून या संस्थेची मी कायम ऋणी राहीन.


यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांनी संस्थेचे विविध उपक्रम आणि संस्थेचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले. त्रिशाला कदम यांना यापूर्वी सुद्धा अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्रिशाला कदम यांच्या या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत कांदळगाव, मसुरे, मालवण भागामध्ये कौतुक आणि अभिनंदन होत आहे.यावेळी बौद्ध समाजाचा कोकणस्थ वधू वर मेळावा ही संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग तांबे यांनी केले.

rapan bottom