Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर आयोजित इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मालवण : बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच" खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. साने गुरुजी वाचन मंदिरचे अध्यक्ष श्री शैलेश खांडाळेकर यांनी स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना इंग्रजी मधून आपले विचार व्यक्त करता यावेत यासाठी सेवांगणने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.त्याचा उपयोग पुढिल जिवनात नक्कीच होईल असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.इयत्ता ५वी ते७ वी आणि इयत्ता ८वी ते १० वी या दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. टोपीवाला हायस्कूल, जिल्हा परिषद रेवतळे शाळा,जय गणेश इंग्लिश स्कूल, आणि भंडारी हायस्कूल या शाळांमधील एकूण २२ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

यातील विजेते पुढीलप्रमाणे
विभाग पहिला


प्रथम -सोहम गवाणकर(टोपीवाला हायस्कूल,मालवण)
द्वितीय - अस्मी आठलेकर(टोपीवाला हायस्कूल,मालवण)
तृतीय -मनस्वी कवठकर(जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण)
उत्तेजनार्थ प्रथम-आदित्य प्रभू गांवकर (टोपीवाला हायस्कूल, मालवण)
उत्तेजनार्थ द्वितीय - प्रसन्न सामंत(टोपीवाला हायस्कूल,मालवण)


विभाग दुसरा


प्रथम -तृष्णा गांवकर(जय गणेश इंग्लिश स्कूल)
द्वितीय -फाल्गुनी हिंदळेकर(टोपीवाला हायस्कूल)
तृतीय -वेदिका तळवडेकर (टोपीवाला हायस्कूल)
उत्तेजनार्थ प्रथम-आर्या दिघे( जय गणेश इंग्लिश स्कूल)
उत्तेजनार्थ द्वितीय -साक्षी रावराणे (टोपीवाला हायस्कूल)


यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

यातील विजेते पुढीलप्रमाणे


प्रथम -प्रांजली कुंभार ( ओझर विद्यामंदिर)
द्वितीय -अनन्या पाटकर (टोपीवाला हायस्कूल)
तृतीय - दुर्वा पराडकर(टोपीवाला हायस्कूल)
उत्तेजनार्थ प्रथम- मधुरा वस्त(टोपीवाला हायस्कूल)
उत्तेजनार्थ द्वितीय - तन्मय परब (भंडारी हायस्कूल)


सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री विजय जोशी,श्री राजन हरमलकर,श्री अभय शेटये श्री शैलेश खांडाळेकर यांनी केले तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण कु. मनाली वेंगुर्लेकर यांनी केले.


याप्रसंगी व्यासपीठावर बॅ नाथ पै सेवांगणचे कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते. त्यांनी सेवांगण मार्फत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी,पालक,स्पर्धक, शैक्षणिक संस्था,मान्यवर परिक्षक, पत्रकार यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी स्पर्धेची सर्व व्यवस्था ग्रंथालय कर्मचारी आणि सेवांगण कर्मचारी यांनी पाहिली.कार्यक्रमाला तरूण भारतचे पत्रकार श्री राजेश मोंडकर,श्री महेंद्र पराडकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सौ.नाईक,श्रीम. फर्नांडिस, शालेय शिक्षक,पालक उपस्थित होते.

rapan bottom