Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी

आरटीओकडे मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास अवैध मालवाहतूक रोखणार

निलेश जोशी  | कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा माल , तयार झालेला माल इत्यादींचे समावेश असतो… याचा फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील गुड्स परमिट असलेल्या स्थानिक टेम्पो, ट्रक, व्यवसायिक बसतो. स्लिपर कोच, प्रवाशी सिट, कॅरिअर(टप) आणि डीकी मधुन अशी माल वाहतूक होते. आणि प्रवासी भाड्या पेक्षा अशा प्रकारचा विना बिलाचा आणि GST चुकविलेला माल याचे जास्त भाडे लक्झरी मालकाना मिळते. यामुळे अवाजवी प्रवाशी भाडे वाढ, प्रवाशांशी अरेरावी हे प्रकार होतात .यालाच आळा बसण्यासाठी यापूर्वी देखील मनसेचे वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे यांनी अनेक आंदोलने केली होती. परंतु किरकोळ कारवाई वगळता आरटीओ मार्फत ठोस अशी कोणतीच कारवाई अदयाप झालेली नाही.

याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी निवेदनाद्वारे परिवहन अधिकारी श्री काळे यांना खाजगी बस वाहतूकदार यांच्याकडून होणारी अतिरिक्त भाडे वाढ व विना परवाना मालवाहतूक यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून खाजगी लक्झरी मार्फत होणारी मालवाहतूक रोखण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आर टी ओ अधिकारी याला जबाबदार असतील असे देखील म्हटले आहे. याची प्रत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देवुन विषयाची चर्चा करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, वाहतूकसेना मनसे विजय जांभळे, माजी उ प तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुडाळ यतीन माजगावकर उपस्थित होते.

rapan bottom