Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

वेंगुर्ल्यात २१ मार्चपासून भगवा चषक अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा

वेंगुर्ला : श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ म्हाडा आयोजित व वेंगुर्ले शहर शिवसेना पुरस्कृत भगवा चषक नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील म्हाडा वसाहतीत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा २१, २२ व २३ मार्च रोजी रात्रीची खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १७,७७७, उपविजेत्या संघाला ११,१११, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ३३३३ रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला भगव्या चषकानेही सन्मानित करण्यात येणार आहे.


उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर आदी पारितोषिकेही देण्यात येतील. या स्पर्धेत मठ, वडखोल, वेंगुर्ले शहर, अणसूर नाका, भेंडमळा, आडारी, मूठ, उभादांडा, बागायतवाडी, दाभोसवाडा, नवाबाग, भटवाडी येथील संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या २० संघांना स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी सदानंद मुळे-९४०४३९६०७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom