मिली मिश्रा । ओरोस : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५ या वर्षातील ही पहिली लोक अदालत असून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून पक्षकारांना करण्यात आले आहे.

