Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवण्यात यावी

क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवण्यात यावी

विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलच्या वतीने प्रशासनास निवेदन

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… हर हर महादेव… भारत माता की जय… अशा घोषणा देत मालवण शहरात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या उत्साहात दुचाकी रॅली काढली. उजबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मा औरंगजेब याची छत्रपती संभाजी महाराज नगर येथे असलेली कबर हटविण्यात यावी. याबाबत राज्य शासन यांच्याकडे मागणी करणारे निवेदन तहसीलदार वर्षा झाल्टे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी
सादर केले.

विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवण कुंभारमाठ येथे एकत्र जमत तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा दिल्या. त्यानंतर कुंभारमाठ येथून देऊळवाडा - भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते तहसीलदार कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोरही जोरदार घोषणाबाजी करून औरंगजेबची कबर काढून टाकावी अशी मागणी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या होत्या तसेच मोर्चा दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे भाऊ सामंत, बजरंग दल मालवण संघटक श्रीराज बादेकर, भाऊ सामंत, विलास हडकर, राजन परुळेकर, अनिकेत फाटक, संदीप बोडवे, ॲड. समीर गवाणकर, विजय केनवडेकर, केदार झाड, आपा लुडबे, ॲड. हेमेंद्र गोवेकर, अविनाश समांत, शिल्पा खोत, नंदा सारंग, शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, गणेश चव्हाण, समीर शिंदे, दादा वेंगुर्लेकर, अजित गवंडे, भालचंद्र राऊत, आनंद खवणेकर, सुशांत तायशेटे, ललित चव्हाण, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी विलास हडकर यांनी मोर्चाच्या वतीने निवेदन केले. मुघल शासक औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे. वास्तविक औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मरण पावला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे दफन केले गेले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली. औरंगजेबने शीख गुरू तेगबहादूर यांची क्रूर हत्या केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरहत्या केली. श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर व मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा त्याने विध्वंस केला. सोरटी सोमनाथ मंदिर फोडले, त्रंबकेश्वर मंदिर जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. अशा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे, असेही यावेळी हडकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे निवेदन यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांना सादर करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे उपस्थित होते. योग्य पद्धतीने औरंगजेबची कबर पूर्णपणे काढून टाकावी तसे न झाल्यास पूर्वसूचित करून हिंदू विश्व परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कुच करून औरंगजेबाची कबर उध्वस्त करतील, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

फोटो : औरंगजेबची कबर उध्वस्त करावी या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने मालवण तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले.

rapan bottom