मिली मिश्रा । कणकवली : महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय सुरु केले पाहिजेत. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गट स्थापन करून सामूहिकरीत्या उद्योग व व्यवसाय सुरु केले पाहिजेत. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा. समाजातील महिलांना सन्मानाने वागणूक मिळाली तर त्या अधिक प्रगती करतील, असे प्रतिपादन डॉ. ढवळे यांनी केले.
फणसगाव-विठ्ठलादेवी गावातील वर्धमान, वर्धन, विरांगना, वरदायिनी या बचत गटांतर्फे महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी डाॅ. ढवळे बोलत होते. यावेळी अलका नारकर, सायली नारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच ज्योती नारकर, चंद्रकला नारकर, स्त्री विश्व संघटनेच्या संस्थापक सायली नारकर, अनिता नारकर, पोलीस भरती परीक्षेत पास झालेल्या प्रतीक्षा खुळेता या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अलका नारकर म्हणाल्या, महिलांचे प्रश्न महिलांनी सोडवण्यासाठी बचत गट हे महत्त्वाचे माध्यम आहे. मी याचाच विचार करू गावात बचत गट सुरू होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि तुम्हा सगळ्या भगिनींमुळे ते प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळेच या बचत गटांतर्फे महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
सायली नारकर म्हणाल्या, अलका नारकर या महिलांना एकत्रिक करून बचत गट चालवल आहेत. तुम्ही सर्वांनी आपापले गट सभाळा. सिधुदुर्गात अलका नारकर या एकमेव महिला आहे ज्यांनी चार बचत गट सुरू केले. महिलांना रोजगाराची सधी उपलब्ध होण्यासाठी जनशिक्षण व बँक ऑफ इंडिया मार्फत त्या प्रशिक्षण देत आहेत.

