Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कर्तृत्व दातृत्व आणि खंबीर नेतृत्व….

कर्तृत्व दातृत्व आणि खंबीर नेतृत्व….

लोकप्रिय आमदार निलेशजी नारायणराव राणे…

आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीत विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे आमदार निलेश राणे सहकार्यांसाठी आपुलकीचे नाते नेहमीच जपतात. जो व्यक्ती निलेश राणे यांच्या संपर्कात आला तो निलेश राणेंचा चाहता होतो. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश राणे यांची असलेली तळमळ व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासपूर्ण काम करताना जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणण्याची कार्यपद्धत आदर्शवत अशीच आहे. सोबतच त्यांच्या हृदयात आपलेपणाची भावना खोलवर आहे. ज्यांनी ज्यांनी निलेश राणे जवळून अनुभवले ते सर्वजण सांगतील आमदार निलेश राणे म्हणजे कार्यकर्त्यांना जपणारे हळव्या मनाचे दिलदार नेतृत्व होय….!

आमदार निलेश राणे हे वडील खासदार नारायणराव राणे यांच्या प्रमाणेच आक्रमक व्यक्तिमत्व. सोबतच वडिलांप्रमाणे प्रत्येक विषयाची परिपूर्ण माहिती व खोलवर अभ्यास त्यांचा असतो. सर्वच विषयाची प्रचंड माहिती त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व व उच्च विभुषितपणा स्पष्ट करणारी ठरते. राजकारणातील अभ्यासूपणा हा वडिलांचा आदर्श आमदार निलेश राणे यांच्या अंगी स्पष्टपणे दिसून येतो. कुठल्याही राजकीय मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी दिलेले संदर्भ तंतोतंत असतात.

वक्तृत्वातील आक्रमकपणा त्यांचा नेहमीच राहिला आहे. विरोधकांवर आक्रमक पद्धतीने शाब्दिक प्रहार करून ते नेहमीच विरोधकांना हतबल करत राहिले आहेत. सोबतच लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवा करत असताना जे बोलणार ते करणारच. नुसती बडबड, खोटी आश्वासने हे 'राणेंच्या' रक्तातच नाही. जे आहे ते थेट आणि स्पष्ट. हा आ. निलेश राणे यांचा स्पष्टपणा अनेकांना भावतो. सहकारी कार्यकर्त्या साठी नेहमीच मदतीसाठी ते तत्पर असतात. याच त्यांच्या स्वभाव गुणामुळे युवा वर्ग, सर्वासामान्य जनता मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत जोडले जात आहेत.

उच्चशिक्षित निलेश राणे वयाच्या अगदी २८ व्या वर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. आपल्या लोकप्रतिधी कार्यकाळात देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी जनहिताचे अनेक प्रश्न मांडले. विकासासाठी मोठा निधी खेचून आणला. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण पध्दतीने संसदेतील चर्चेत सहभाग नोंदवला. एक उत्तम संसदपटू म्हणून लोकसभेतील त्यांचा कार्यकाळ एखाद्या अनुभवी खासदारा प्रमाणे यशस्वी असाच राहिला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघांचे आमदार म्हणून निलेश राणे यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. आमदार पदी विजयी झाल्या नंतर पहिल्या दोन्ही अधिवेशनात त्यांनी मांडलेले मुद्दे महत्वपूर्ण ठरले. मच्छिमार, शेतकरी व सर्वासामान्य जनतेच्या समस्या मांडताना त्यांना न्याय मिळवून देणे. गोहत्या, हिंदुत्व यां ज्वलंत विषयातील त्यांची आक्रमक भुमिका राज्य स्तरावरील धोरणत्मक निर्णयात अत्यंत महत्वाची ठरली. सोबतच मतदार संघात शेकडो कोटी विकास निधी मंजूर करून घेण्यात आमदार निलेश राणे यशस्वी ठरले. विकासाचे व्हिजन घेऊन शाश्वत विकास हेच लक्ष ठेवून आमदार निलेश राणे जनसेवा करतं आहेत.

पद असो वा नसो हा माणूस नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांत राहिला. त्यांनी कार्यकर्ते जपले, माणसे जपली. म्हणूनच निलेश राणे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपले वाटतात. कार्यकर्त्यांसाठी जनहिताच्या प्रश्नांसाठी, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणाच्याही विरोधात जाण्याची प्रसंगी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी निलेश राणेंची असते. त्यावेळी पद, मानसन्मान याचा कोणताही विचार ते करत नाहीत. सर्वसामान्य जनता, पक्षाचा कार्यकर्ता, सहकारी यांना प्राधान्याने न्याय मिळाला पाहिजे. यासाठी त्यांची बाजू निलेश राणे नेहमीच उचलून धरतात. सोबतच वडिलांवर सर्वाधिक प्रेम असलेले हे व्यक्तिमत्व वडिलांविरोधात कोणतीही टीका सहन करत नाहीत. एकूणच माणसे आणि नाती जपणारे हे नेतृत्व त्यांच्या स्वभावातून त्यांचा दिलदार पणा स्पष्ट करते.

ज्यांनी ज्यांनी निलेश राणे जवळून अनुभवले तो प्रत्येक जण सांगेल, 'निलेश राणेंसारखा सच्चा मनाचा दिलदार नेता नाही'. खासदार नारायण राणे साहेबांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाला निलेश राणे यांच्यात दिसतात.

अनेक रुग्णांना जीवदान

आमदार निलेश राणे अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत, ठरत आहेत. आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरु असलेले त्यांचे सेवाकार्य देशपातळीवर आदर्श ठरावे असेच आहे. अनेक रुग्णांना जीवदान देण्यात, आजार मुक्त करण्यात त्यांची भुमिका मोलाची ठरली आहे, ठरत आहे.

आमदार निलेश राणे कार्यकर्ते, जनता यांच्यासोबत असतात तेव्हा हळव्या मनाचे निलेश राणे, हसतमुख राणे प्रत्येकजण अनुभवतो आणि निलेश राणे यांचा फॅन होतो, चाहता होतो, मित्र होतो.

असे हे दिलदार नेतृत्व मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात तन, मन, धन अर्पण करून सेवा कार्य करत आहेत. प्रत्येक जबाबदारी यशस्वी पणे पार पाडत आहेत. अनेकवेळा स्वखर्चातून करत असलेले सेवाकार्य निश्चितच आदर्श ठरेल असेच आहे. सोबतच शिवसेना पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारत निलेश राणे संघटन अधिक मजबूत करणे, ही जबाबदारीही समर्थपणे सांभाळत आहेत. यश मिळवत आहेत. यशस्वी होत आहेत.

आगामी काळातही त्यांचे हे सेवाकार्य अखंडित सूरू राहून लोकप्रिय आमदार म्हणून ते निश्चितच यशस्वी ठरतील. आमचे आमदार देशात आदर्श ठरतील अशीच भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

शब्दांकन : अमित खोत

rapan bottom