Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ मॉन्सून रन ठरली बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन

कुडाळ मॉन्सून रन ठरली बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन

मुंबई रोड रनर तर्फे आयोजकांचा सन्मान

राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने केले होते मॅरेथॉन आयोजन

कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर, कुडाळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'कुडाळ मॉन्सून रन'ला 'बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द इयर २०२४ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई रोड रनर या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व मॅरेथॉन मधून कुडाळ मॉन्सून रनची हाफ मॅरेथॉन गटात निवड करण्यात आली. अलिकडेच मुंबईत झालेल्या सोहळ्यात राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुडाळचे ए टी राणे आणि डॉ. जी टी राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा सन्मान स्वीकारला.


या सोहळ्यात कुडाळ मान्सून रनला ‘बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द ईयर 2024’ च्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर टाटा मॅरेथॉनला बेस्ट रेटेड फूल मॅरेथॉन ऑफ द ईयर 2024 ने सन्मानित करण्यात आले.
मुंबई रोड रनर या संस्थेमार्फत महाराष्ट्र व इतर जवळच्या झालेल्या सर्वे मध्ये कुडाळ मान्सून रन ही पहिली ठरली.


मुंबई रोड रनर सर्व मोठ्या मॅरेथॉनला रेटिंग देते. कुडाळ मान्सून रन ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच आयोजित मान्सून मॅरेथॉन होती. पहिल्याच आयोजनामध्ये एवढी मोठी गरुड भरारी घेतल्यामुळे आयोजकांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. मुंबई रोड रनरच्या परीक्षकांनी सुद्धा आयोजकांचे खूप कौतुक केले.


कुडाळ मान्सून रन ही राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर, कुडाळ यांच्या मार्फत ‘हेल्थ अवेरनेस‘ म्हणून दरवर्षी घेण्यात येणार आहे. यासाठी सुद्धा त्यांचेही कौतुक मुंबई रोड रनरच्या सोहळ्यात करण्यात आले.

rapan bottom