Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन

मालवण | प्रतिनिधी : भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थिनींसाठी आयोजित पाककला स्पर्धा भंडारी हॉल मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी मासे व चिकन यापासून विविध रुचकर व मसालेदार पदार्थ सादर केले होते.

स्पर्धेचे उदघाटन मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मालवणचे नायब तहसीलदार नागेश शिंदे, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सचिव दशरथ कवटकर, लोकल कमिटी खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. दळवी, माजी विद्यार्थिनी व मत्स्य विभाग अधिकारी तेजस्विता करंगुटकर, माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर, हेमंत शिरगांवकर, भूषण मेतर, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, शुभम मेस्त्री,आकाश गोसावी, लतेश मडये सुजल कांबळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बांदेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्पर्धकांनी मासे व चिकन पासून बनविलेले विविध चवदार पदार्थ बनवून आणून आकर्षक पद्धतीने सजावट करून मांडले होते. स्पर्धेचे परीक्षण अतिथी बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे, आशीर्वाद कॅटरर्सच्या मालक सौ. ममता वराडकर, काळबादेवी एक्झॉटीकाचे शेफ वैभव तोंडवळकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रमुख रुचिरा नार्वेकर, अश्विनी वायंगणकर रुपल परब, कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले. आभार सौ. प्रणाली शिंदे यांनी मानले.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल ४ मे रोजी मालवण येथे होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे.

rapan bottom