Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

हजारोंच्या उपस्थितीत होणार ऐतिहासिक 'शिवायन' महानाट्य

हजारोंच्या उपस्थितीत होणार ऐतिहासिक 'शिवायन' महानाट्य

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवसाचे औचित्य

16 मार्च रोजी मालवण बोर्डिंग मैदानावर आयोजन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी 'शिवायन' या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात यां महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

सोमवार १७ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे मात्र आमदार अधिवेशनात असल्याने रविवार १६ मार्च रोजी मालवण कुडाळ मतदार संघात त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर तसेच महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. जनता मोठया संख्येने आमदार निलेश राणे यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे महानाट्य होणार त्या ठिकाणी दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना पदाधिकारी संजय पडते, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, दीपलक्ष्मी पडते, बाळा चिंदरकर, विश्वास गांवकर, दादा साईल, दीपक पाटकर, किसन मांजरेकर, रत्नाकर जोशी, जॉन नरोना, मधुकर चव्हाण, राजु बिडये, मंदार लुडबे, दिलीप बिरमोळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त प्रेक्षकांना हे महानाट्य पाहता यावे यासाठी मोठया प्रमाणात बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. हा संपुर्ण सोहळा ऐतिहासीक ठरेल असे दत्ता सामंत म्हणाले.

rapan bottom