Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळात जल्लोषात धुळवड साजरी

कुडाळात जल्लोषात धुळवड साजरी

जिजामाता चौकात सर्वपक्षीय धुळवड

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहरात आज शहरवासियांनी मोठ्या जल्लोषात रंग आणि पाण्याची उधळण करत धुळवड आणि  रंगपंचमी साजरी केली.

नाक्यानाक्यावर आणि सोसायट्यामध्ये युवक, लहान मुले रंग खेळताना पाहायला मिळाले. यावेळी कुडाळ शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची धूलिवंदनाने सांगता झाली. शहरातील जिजामाता चौक येथे सालाबादप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. वेगवेगळी सोंगे घेत शिमग्याचे पोस्त मागण्याची परंपरा देखील जपण्यात आली. काही ठिकाणी डीजे तर काही ठिकाणी ढोल पथकाच्या तालावर तरुणाई रंग खेळताना पाहायला मिळाली.

जिल्ह्यात सर्वत्र गुरूवार पासून सर्वत्र मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला असून शिमगोत्सवाची धूम चालू आहे. जिल्ह्यात दीड, पाच, सात, पंधरा दिवसांचा शिमगा असतो.

शुक्रवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात रंगांची उधळण करीत शहरवासियांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. दुपारी शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता झाली. मात्र ग्रामीण भागात शिमगोत्सवाची उत्साहात साजरा केला जात आहे.

rapan bottom