ओसरगाव : कै. विनय आळवे वाचनालय व ग्रंथसंग्रहालय ओसरगाव व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव-कानसळी वाडी येथे मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त इ.1ली ते 2 री,3 री ते 4 थी व 5 वी ते 7 वी या गटात कथाकथन स्पर्धा घेण्यात आले होते त्याचा बक्षीस वितरण व शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम रोटरी क्लबचे पदाधिकारी व ग्रंथालयाचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विलास गोसावी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले ,आपल्या प्रास्ताविक भाषणात ग्रंथालयाचे अध्यक्ष व रोटरी क्लबचे खजिनदार दीपक आळवे यांनी मराठी राज्यभाषा गौरव दिनाचे महत्त्व, मराठी भाषेच प्रचार,प्रसार,संवर्धन व वाचन,कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय,त्यांचे साहित्य व त्यांच्या निवडक कवितांचे वाचन केले.मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे वाचक सभासद होण्याचे आवाहन केले तसेच रोटरी क्लब सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची माहिती दिली .
तिन्ही गटातून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कथांचे उत्तम रित्या सादरीकरण केले .1 ते 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले.
या वेळी ग्रंथालयाचे उत्कृष्ट वाचक व नियमित वाचक यांचाही मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करून गौरव करण्यात आला .विद्यालयाच्या मुलींचा रिले संघ कणकवली तालुका पातळीवर यशस्वी झाल्याबद्दल त्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला शिवाय विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रोटरी क्लब व वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले .या वेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या .
व्यास पिठावर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.व्हिक्टर फर्नांडिस ,आळवे वाचनालयाचे अध्यक्ष व रोटरी क्लब चे खजिनदार .दीपक आळवे, रोटरी क्लबचे सचिव अरुण मालणकर,उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण,रोटरीयन प्रथमेश सावंत ,मुख्याध्यापक विलास गोसावी,ग्रंथालयाचे संचालक तारक आळवे,शंकर परब ,गजानन परब,ग्रंथपाल सौ.दीपाली आळवे ,शिक्षक व पालक उपस्थित होते.

