वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला तालुका शाखेच्या सभेत मंडळाच्या युवा समितीच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी वेंगुर्ले माणिक चौक येथील युवा व्यापारी श्री.रोहीत दत्ताराम वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
रोहित वेंगुर्लेकर यांचा व्यवसायासोबत समाजाच्या कामात चांगला सहभाग असतो. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून समाजाची ही नवीन जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडी बद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला तालुका यांची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये जिल्ह्याच्या वतीने जिल्हा संघटक म्हणून श्री. गुरुप्रसाद चव्हाण यांची तर वेंगुर्ले युवा तालुकाध्यक्ष म्हणून श्री. रोहित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी दोघांनाही जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सूचित जाधव व सचिव चंद्रसेन पाताडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व वेंगुर्ला तालुक्यातील समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समाजाचा व्यवसाय नव्या पिढी पर्यंतही सुरू ठेवल्याबद्दल रोहित वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

