मिली मिश्रा । कणकवली : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणाऱ्या युजीसी-नेट परीक्षेत फोंडाघाट येथील दुर्गेश परेश बिडये यांनी यश संपादन केले. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी सोशल मेडिसिन आणि कम्युनिटी हेल्थ या विषयावर लक्ष केंद्रित करून ही परीक्षा दिली होती. युजीसी-नेट परीक्षा ही शैक्षणिक क्षेत्रातील वैज्ञानिक विभागात अतिशय कठीण मानली जाते. दुर्गेश हे सध्या जे. एस. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, मैसूर याठिकाणी फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयात पी. एच. डी. करीत आहेत . युजीसी-नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल दुर्गेश यांचे सर्वस्तरांतून कौतुक केले होत आहे. या यशाचे श्रेय दुर्गेश यांनी आजोबा, आई-वडील, शिक्षकांना दिले आहे.

दुर्गेश बिडये यांचे युजीसी-नेट परीक्षेत यश
