Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न

अनंत मुस्कान अंतर्गत सहविकसन कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्ग : हेलिस सेखसरिया इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबई यांच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 'सहविकसन कार्यशाळा' जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.


'अनंत मुस्कान' भारतातील प्राथमिक शाळांमध्ये ब्रशने दात घासणे आणि तोंडाचे आरोग्य शिक्षण याबद्दल विविध राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती कार्यशाळेस लाभली होती.
या कार्यशाळेसाठी डॉ. उमेश शिरोडकर (Deputy director oral health, public health department maharashtra) हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी रामचंद्र अंगणे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, संचालक, हेलिस डॉ. मंगेश पेडणेकर आणि डॉ. खुशबू शर्मा (कार्यक्रम प्रमुख, अनंत मुस्कान) श्रीम.अक्षता गोजे (project Research scientist) डॉ.संजिनवी शेटे (Project Research scientist) यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, NOHP दंत शल्य विशारद, क्लस्टर अधिकारी, RBSK समन्वयक, १० समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), तसेच कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यातील २० शिक्षक व मुख्याध्यापक व Healis Team यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा अंतर्गत शालेय मुलांमध्ये तोंडाच्या आरोग्यविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ब्रशने दात घासण्याच्या सरावाची अंमलबजावणी तसेच मुलांना आणि पालकांना तोंडाचे आरोग्य शिक्षण सत्र चालू केले आहे. आरोग्य आणि शिक्षण विभाग यांचा सहभाग, तसेच कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक सहकार्य यावर सखोल चर्चा करण्यात आली.


हेलिस टीमने पुढील वर्षाच्या कार्यक्रमासाठी उद्दिष्टे, अंमलबजावणी योजना आणि प्रशिक्षण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त सूचना आणि आपल्या भूमिका मांडल्या.अनंत मुस्कान कार्यक्रम हा मुलांच्या आरोग्यसंबंधित समस्यांवर प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

rapan bottom